टायगर श्रॉफ हल्लाप्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारतींच्या पोस्टने खळबळ, श्रेयवादावरुन नाराजी

Foto
मुंबई  : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करणार्‍या हल्लेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काल संध्याकाळी मुंबईच्या जुहू परिसरात टायगर श्रॉफ ( )  याच्या कारवर गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर हे दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यासाठी काल रात्री तिन्ही हल्लेखोरांनी वसई येथून जयपूरला जाणारी ट्रेन पकडली होती. मात्र, मुंबई पोलिसांच्या ( ) जलद हालचालींमुळे या तिन्ही हल्लेखोरांना सोमवारी सकाळी १० वाजता कोटा रेल्वे स्थानकात राजस्थान पोलिसांनी अलगदपणे पकडले. मात्र, या सगळ्या ऑपरेशनसाठी मुंबई पोलिसांनी कोटा पोलिसांना महत्त्वाची माहिती पुरवली होती. परंतु, कोटा पोलिसांनी आरोपींना आपण एकट्यानेच पकडल्याचे श्रेय घेण्यासाठी लगेच पत्रकार परिषदही घेऊन टाकली. मुळात या आरोपींना पकडल्यानंतर त्यांना मुंबईला नेले जाणार होते. मात्र, कोटा पोलिसांनी ( ) या आरोपींना प्रसारमाध्यमांसमोर आणत एक जंगी पत्रकार परिषदच घेऊन टाकली. कोटा शहर येथील पोलीस अधीक्षक आणि आयपीएस तेजस्विनी गौतम यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.  यामुळे मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

देवेन भारती यांनी एक सूचक संदेश असलेली पोस्ट लिहली आहे. यामध्ये देवेन भारती यांनी म्हटले आहे की, 'Success has many fathers, failures have नॉन देवेन भारती यांच्या या वक्तव्याचा रोख राजस्थान पोलिसांच्या दिशेने असल्याचे बोलले जात आहे. आयपीएस तेजस्विनी गौतम यांनी आमच्या पोलीस दलाने कसा सापळा रचून तीन आरोपींना पकडले, याचा पाढा वाचला. ही पत्रकार परिषद देशातील सर्व प्रमुख प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडियावर लाईव्ह दाखवण्यात आली. यामुळे टायगर श्रॉफवर हल्ला करणार्‍या तिघांना पकडल्याचे श्रेय साहजिकच कोटा पोलिसांना मिळाले. यावरुनच देवेन भारती यांनी आयपीएस तेजस्विनी गौतम यांना टोला हाणल्याची चर्चा रंगली आहे.

कोटा पोलिसांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय सांगितलं?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या दिशेने गोळीबार केल्याप्रकरणी, कोटाच्या पोलीस अधीक्षक () तेजस्विनी गौतम यांनी सांगितले की, ङ्गङ्घ...आज सकाळी आम्हाला माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही आमच्या पथकाला सतर्क केले. गोळीबारात सामील असलेले तीन मुख्य संशयित रेल्वेने प्रवास करत असून ते कोटा येथे येणार असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या माहितीच्या आधारे, आमच्या पथकाने अवघ्या १५ मिनिटांत सापळा रचला आणि संपूर्ण रेल्वेची कसून तपासणी केली. कोटा शहर पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे, आम्ही गोळीबारासाठी जबाबदार असलेल्या तिन्ही संशयितांना पकडले आहे. आम्ही लवकरच या संशयितांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देऊ. या तिघांची नावे खालीलप्रमाणे आहेत: हरियाणातील सोनीपत येथील रेहान ऊर्फ सुक्का; बिहारमधील बेगुसराय येथील हृतिक कुर्मी ऊर्फ रोशन (जो गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील मुंबईत राहत होता); आणि एक अल्पवयीन व्यक्ती. आम्ही या तिघांनाही ताब्यात घेतले असून, आता त्यांना मुंबई पोलिसांच्या हवाली करणार आहोतङ्घङ्घ, असे पोलीस अधीक्षक तेजस्विनी गौतम यांनी म्हटले.